आकारणी अधिकारी यांच्याकडून एकाच प्रकारच्या वेगवेगळ्या दोन केसेसमधील निर्णयात सातत्याने तत्त्व अवलंबिले जाणे आवश्यक आहे

आयकर : न्याय-विनिर्णय-नवनीतम्


आकारणी अधिकारी यांच्याकडून एकाच प्रकारच्या वेगवेगळ्या दोन केसेसमधील निर्णयात सातत्याने तत्त्व अवलंबिले जाणे आवश्यक आहे

केसची हकीकत : यापूर्वीच्या सुप्रीम कोर्टाद्वारे निर्णित बर्जर पेंट्स (इं.) लि. वि. सीआयटी (२००४) २६६ आयटीआर ९९ या केसचा संक्षिप्त गोषवारा : या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की, कर विभागाने हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिले नसेल व तो निर्णय स्वीकारला असेल, तर हायकोर्टाने दुसऱ्या त्याच प्रकारच्या केसमध्ये दिलेल्या निर्णयास करविभाग उचित कारणाशिवाय आव्हान देऊ शकत नाही.
सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणानुसार करविभागाने हायकोर्टाच्या आदेशाला जाणीवपूर्वक आव्हान दिलेले नाही. त्या निर्णयाप्रमाणे इंटरकनेक्ट युजर चार्जेसबाबत केलेल्या पेमेंटवर कोणतीही स्त्रोतातून कपात करावयाची नाही कारण ती रक्कम तांत्रिक सेवा या श्रेणीत समाविष्ट असते. त्यावर शुल्क आकारणी होत नसते. त्यामुळे हायकोर्टाने अशाच स्वरूपाच्या अन्य केसेसमध्ये दिलेल्या निर्णयाला करविभाग काही ठोस कारणाशिवाय आव्हान देऊ शकणार नाही.
सध्याचे अपील दाखल करावयाचे कारणही उपरोक्त केसशी संबंधित आहे. अपिलीय ट्रायब्यूनल यांनी कलम १९४ अंतर्गत इंटर कनेक्ट युजर चार्जेसच्या पेमेंटबाबत टीडीएस कपात करता येत नाही असा निर्णय दिलेला आहे. कारण इंटर कनेक्ट युजर चार्जेसचे वर्गीकरण तांत्रिक सेवेवरील शुल्कात होत नाही. कर्नाटक हायकोर्टाने सीआयटी (टीडीएस) वि. वोडाफोन साऊथ लि. (२०१६) ७ आयटीआर – ओएल २९८ (कर्नाटक)(२०१६) ७२ टॅक्समन.कॉम ३४७ (कर्ना) या केसमध्ये प्रतिवादी करदात्याच्या बाजूने निर्णय दिलेला आहे. मात्र करविभागाने असा युक्तिवाद केला की, बॉम्बे हायकोर्टासमोर अशाच प्रकारची केस प्रलंबित आहे.
यापूर्वी डिव्हिजन बेंच यांनी दि. २२.३.२०२१ रोजी असे स्पष्ट केलेले आहे की, कर्नाटक हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध कोणतेही स्पेशल लीव्ह पिटिशन दाखल केलेले नसल्याने तो निर्णय अपीलकर्त्या करविभागावर बंधनकारक ठरतो. डिव्हिजन बेंच यांनी करविभागास निर्देश देऊन याबाबत प्रत्यक्ष करमंडळाकडून आवश्यक / त्या सूचना घेऊन यावर मार्ग काढावा असेही स्पष्ट केले.

सुप्रीम कोर्टाने बर्जर पेंटस वि. सीआयटी (२००४) २६६ आयटीआर ९९ (सुप्रीम) १३५ टॅक्समन.कॉम ५८६ (सुप्रि) या केसचा संदर्भ देऊन करविभागाचे अपील नामंजूर केले.

[ सीआयटी (टीडीएस) वि. टाटा टेलिसर्व्हिसेस लि. (२०२३) ४५६ आयटीआर ६९१ (दिल्ली हायकोर्ट) ]

संबंधित पोस्ट :

उत्पन्न दडवून ठेवले किंवा उत्पन्नाचे तपशील चुकीचे दाखल केले या कारणाने करदात्यास आकारलेला दंड व केलेली उत्पन्नवाढ ट्रायब्यूनलने रद्द ठरवली. सुप्रीम कोर्टाने ट्रायब्यूनल व हायकोर्टाच्या निर्णयात कोणताही हस्तक्षेप करण्यास नकार दिला

झडती व जप्ती कारवाई दरम्यान करदात्याला दोषी ठरवणारी सामग्री व कागदपत्रे आढळून आली. अन्वेषणामध्ये त्यांची पुष्टी करण्यात आली. हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट यांनी आकारणी न्यायोचित असल्याचा निकाल दिला

कर चुकवण्याचा व खोटे जबाब देण्याचा आरोप असलेल्या करदात्याकडे चौकशी केली असता कोणतीही आक्षेपार्ह सामग्री आढळून आली नाही. चौकशी दरम्यान आरोपीस आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही

sanpadkiy

गुंतवणूक किंवा खर्चावर निर्बंध न आणणारा आशावादी अर्थसंकल्प

विकसित भारताच्या स्वप्नांच्या पेरणीवर आरूढ झालेला, युवकांची क्रयशक्ती वाढविणारा व त्यांच्या हातात पैसा खेळेल असा अचंबित करणारा सलग ८ वा अर्थसंकल्प मा. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. मध्यमवर्ग व नोकरदार वर्गावर करसवलतींचा वर्षाव करून ‘खुशाल खर्च करा किंवा स्वतःच्या भविष्याचा विचार स्वतः करा’ असा काहीसा मुक्त संदेश देणाऱ्या अर्थसंकल्पाने खरे पाहता कर सवलतीमध्ये गुंतवणुकीबाबतीत कोणतीही अट घातलेली नाही. त्यामुळे कर वाचविण्यासाठी आयकर करदराच्या जुन्या पद्धतीप्रमाणे गुंतवणूक करणे आवश्यक नाही. परिणामी शासन आपल्या आर्थिकतेचा विचार करेल ही गोष्ट विसरून स्वतःच्या भविष्याचा विचार स्वतः करणे योग्य. महागाईच्या तुलनेत उत्पन्न वाढलेले नाही हेही येथे अधोरेखित होते. परंतु अर्थसंकल्पान्वये ऐतिहासिक अशा कर सुधारणा झाल्या आहेत हेही मान्य करावे लागेल.

श्री. सोहनलाल जी. शर्मा

व्यापारी मित्रचे जनक, सहाय्यक संस्थापक

श्री. सोहनलाल जी. शर्मा


श्री. सोहनलाल जी. शर्मा, बी. कॉम. हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध विक्रीकर सल्लागार असून १९५९ पासून विक्रीकर व अन्य कायद्यासंबंधी पुस्तकेही प्रकाशित केली. जीएसटी कायद्याचा त्यांचा गाढा अभ्यास असून व्यापारी मित्र मासिकाचा जीएसटी विभाग ते पाहतात. व्यापारी मित्र मासिकाचे संपादक स्व. जी. डी. शर्मा यांच्याबरोबर सहाय्यक संपादक म्हणून ६० वर्षे त्यांनी काम केले आहे. व्यापारी मित्र मासिकातर्फे महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या भागात आयोजित केलेल्या जमाखर्च आणि करविषयक ९४ ज्ञानसत्रात विक्रीकर आणि व्हॅट कायद्यासंबंधी त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

सीए. पुरुषोत्तम जी. शर्मा

व्यापारी मित्रचे जनक, सहाय्यक संस्थापक

सीए. पुरुषोत्तम जी. शर्मा,


सीओ. पुरुषोत्तम जी. शर्मा, गेली ४७ वर्षे पुण्यात प्रॅक्टिस करीत आहेत. व्यापारी मित्र मासिकाचे ते सहाय्यक संपादक आहेत. व्यापारी मित्रातर्फे आयोजित आतापर्यंतच्या ९५ ज्ञानसत्रात त्यांनी आयकर, संपत्तीकर, टॅक्स प्लॅनिंग यावर मार्गदर्शन केलेले आहे. विविध व्यापारी संघटनांमध्ये आयकरासंबंधी त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत. विविध ठिकाणी त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. अ. भा. खांडल विप्र शिक्षण फंड ट्रस्टचे ते कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्याचप्रमाणे उमेद परिवार या सेरेब्रल पाल्सी व मतिमंद मुलांच्या संस्थेचे ते फाऊंडर ट्रस्टी आहेत. त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीत उमेद परिवाराने वडकीनाला, सासवड रोड येथे ‘अरविंद सौरभ’ या नावाने मुलांचे पुनर्वसन केंद्र सुरू केले आहे. सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन या सेरेब्रल पाल्सीसाठी सुरू झालेल्या शाळेचे ते फाऊंडर ट्रस्टी आहेत. विविध सामाजिक उपक्रमातही त्यांचा सहभाग आहे.