HomeBlogविविध कायदे / VIVIDH KAYDEव्यवसाय सुरु करण्याची सुलभता :...
घडलेले बदल
- परदेशी कंपनी, त्या कंपनीचे संपर्क कार्यालय (Liason Office) भारतामध्ये उघडू शकते. या ऑफिस द्वारे भारतामधील उद्योग धंद्याची सर्वसाधारण माहिती संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्या कंपनीला गोळा करता येते. सदर परदेशी कंपनी मोठी असेल व त्यांच्या देशात उद्योग धंद्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रात वावर असेल तर संपर्क कार्यालयाद्वारे, कोणत्या उद्योगक्षेत्राच्या वाढीला भारतामध्ये वाव आहे व त्या उद्योगक्षेत्राचे उत्पादन करावयाचे असेल तर त्याला लागणारी जागा, त्याचा किमान खर्च, जागेची उपलब्धता, विजेची सोय व उपलब्धता, मनुष्यबळ या सर्वांची माहिती मिळू शकते.
- परदेशी कंपनी, त्या कंपनीची शाखा भारतामध्ये उघडू शकते. परदेशी कंपनीने त्यांच्या कंपनीची शाखा भारतामध्ये उघडणे हे त्या कंपनीच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे असे समजावयास हरकत नाही. परदेशी कंपनीची शाखा म्हटले म्हणजे शाखेसाठी मोठी जागा, परदेशी स्टाफ, भारतामधील स्टाफ, गुंतवणूक हे सर्व त्याबरोबर आलेच.
- प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एखादी परदेशी कंपनी भारतामध्ये विशेष ऑफिस उघडू शकते. करार पूर्ण होईपर्यंत हे प्रकल्प ऑफिस भारतामध्ये राहू शकते. सर्व साधारणपणे प्रकल्प हे दीर्घकाळासाठी असतात. या काळामध्ये परदेशी कंपन्या भारता-मधील उद्योगक्षेत्राची माहिती गोळा करून भारतामध्ये किती गुंतवणूक करता येईल याचाही विचार करत असतात.
- एखादी परदेशी कंपनी भारतामध्ये एखादा प्रकल्प भारतामधल्या एखाद्या उद्योजकांबरोबर संयुक्तपणे (Joint Venture) राबवू शकते. यामध्ये बरेच वेळा गुंतवणुकीचा जास्तीत जास्त भार परदेशी कंपनी उचलत असते तर तो प्रकल्प किंवा काम पूर्णत्वाला नेण्यासाठी भारतामधल्या लोकांची मदत मिळत असते. यामध्ये दोन्ही देशांचा फायदा होत असतो. परदेशी कंपनीला असे प्रकल्प कमी खर्चात पूर्ण करता येतात व भारताला अशा प्रकल्पामध्ये गुंतवणूक करावी लागत नाही, रोजगार उपलब्ध होतो, तंत्रज्ञान मिळते. कांही वेळा परदेशी कंपन्या त्यांची एखादी उपकंपनी (Wholly Owned Subsidiary) भारतात उघडून असे प्रकल्प पूर्ण करतात. यासाठी मात्र कंपनी कायदा 2013 च्यानियमानुसार कंपनीची स्थापना करावी लागते.
- कांही वर्षांपूर्वी एखादी कंपनी स्थापन करावयाची म्हणजे खूप गोष्टींची माहिती गोळा करायला लागायची व त्यामध्ये प्रचंड वेळ व दिवस जायचे. आता कंपनी स्थापन करणे सुटसुटीत व ऑन लाइन केले असून बरेच वेळा अशी कंपनी एका दिवसात नोंदली जाते. अशा कंपन्या कांही वेळा खाजगी (Private) किंवा सार्वजनिकही (Public) असू शकतात.
- परदेशातील व्यक्तींना भारतामध्ये एखादा उद्योग सुरु करावयाचा असेल तर तो एल एल पी म्हणूनही सुरु करता येऊ शकतो. एल एल पी म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (Limited Liability Partnership LLP). हा कायदा 2008 मध्ये संमत झाला. एल एल पी ही भागीदारी संस्था व कंपनी यांच्या मिश्रणातून तयार झालेली संस्था आहे. यामधील भागीदार जरी बदलत गेले तरीसुध्या ही संस्था चालू राहते. एल एल पी मधल्या भागीदाराला त्याने सुरुवातीला मान्य केलेल्या रकमेपुरतीच (Limited Liability) त्याची आर्थिक जबाबदारी, मर्यादित राहते.
परदेशी कंपन्यांसाठी जागा -
जमीन-जुमला (Property) योग्य मालकाच्या नावावर करण्यामध्ये आणि त्यासुद्धा वेळेवर करण्यामध्ये भारतामध्ये प्रचंड अडचणी होत्या. याचा परिणाम भारतामध्ये येणार्या गुंतवणुकीवरही होत होता. वर्ल्ड बँक व इकॉनॉमिक फोर यांनी याबाबतीमध्ये भारताला 2014 पूर्वी खूप कमी गुण दिले होते. मात्र व्यवसाय सुलभ करण्याच्या योजनेमध्ये केंद्र सरकारने यांवर लक्ष दिले आणि “इंटिग्रेटेड इंडस्ट्रिअल इन्फॉर्मेशन सिस्टीम” हे पोर्टल विकसित केले. या पोर्टलच्या आधारे कोणती जागा शिल्लक आहे किंवा विकाऊ आहे किंवा विकली गेली आहे याची माहिती या पोर्टलच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना वेळेवर मिळू शकेल अशी व्यवस्था केली. यासाठी मुंबई व दिल्ली येथील सर्व सब-रजिस्ट्रार ऑफिस व लँड रेकॉर्ड खाते यांचे एकत्रीकरण केले गेले आणि हळू हळू अन्य शहरातही हे काम चालू आहे. याचा मुख्य फायदा गुंतवणूकदारांना जमिनीची संपूर्ण माहिती सुरुवातीपासून कळते आणि त्यामुळे गुंतवणूकदार, विशेषतः परदेशी, त्या जमिनीमध्ये गुंतवणूक करू शकतो.
बांधकामासाठी लागणारी परवानगी -
विजेची उपलब्धता -
कर पद्धतीत सुधारणा -
परदेशातून येणारी गुंतवणूक -
राज्यांमधल्या सुधारणा
केंद्र सरकारने भारतामधल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये व युनिययन टेरिटरिजमध्ये उद्योगांना गती देण्यासाठी व वातावरण निर्माण व्हावे यांसाठी “बिझिनेस रिफॉर्म्स ऍक्शन प्लॅन”; हे पोर्टल विकसित केले. या पोर्टलच्या माध्यमातून राज्यांमधल्या विशेष क्षेत्राला (Sector Specific) गती देऊन त्या क्षेत्राच्या उद्योगाच्या वाढीसाठी वातावरण निर्माण होईल असा हेतू होता. यामध्ये सर्व राज्यात व युनियन टेरिटरिज मिळून सुधारणा करण्यासाठी एकूण 24 क्षेत्रे निवडली. यामध्ये ट्रेड (Trade) लायसेन्स, हेल्थ केअर, सिनेमा हॉल्स, फायर विमा, टेलिकॉम, पर्यटन इ.चा समावेश आहे. या सर्वात मिळून सुधारणा करता येतील अशा 301 जागा निवडल्या. या जागांचे नियम, कायदे, पद्धती यांचा अभ्यास करून न लागणारे नियम रद्द करणे व उद्योगाला गरज असेल तेवढीच कागदपत्रे मागविणे असे ठरविले.
अन्य सुधारणा -
भारताच्या जी डी पी वाढीमागे उद्योगक्षेत्राचा मोठा वाटा आहे हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने व राज्य सरकारांनी वेगवेगळ्या कायद्यांमधल्या नियमांमध्ये व पद्धतीमध्ये बदल केले व असे बदल करणे चालू आहे; ज्याचा चांगला परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसत आहे. अन्य सुधारणांमध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज या खात्याने “इंडियन कस्टम विंडो प्रोजेक्ट”; विकसित केले व PCS1x च्या मदतीने 27 संबंधित सागरी (Meritime) व्यावसायिकांना एका ठिकाणी (Platform) आणता आले, त्यामुळे आवश्यक असलेल्या किमान कागदपत्रांची संख्या फक्त 3 वर आली.