HomeBlogजीएसटी / GSTनोंदणी रद्द करण्याचा आदेश अवैध...

जीएसटी : न्याय-विनिर्णय-नवनीतम्
नोंदणी रद्द करण्याचा आदेश अवैध ठरवला
केसची हकीकत : पत्रक दाखल केले नाही, कर भरला नाही या कारणाने करदात्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली व त्याचा एक भाग म्हणून शोकॉज नोटीस फॉर्म जीएसटी आरईजी-17 मध्ये देण्याऐवजी फॉर्म जीएसटी आरईजी-31 मध्ये देण्यात आली व त्यात आवश्यक असलेले तपशीलही देण्यात आलेले नव्हते. अधिकार्यांनी त्यानंतर लागलीच नोंदणी रद्द करण्याचा आदेश काढला. मात्र हायकोर्टाने शोकॉज नोटीस व नोंदणी रद्द करण्याचा आदेश अवैध ठरवला.