HomeBlogआयकर / AAYKARकरदात्याने केलेल्या खरेदी-विक्...

आयकर : न्याय-विनिर्णय-नवनीतम्
करदात्याने केलेल्या खरेदी-विक्री व्यवहारांबाबतचे सर्व कागदोपत्री पुरावे सादर केलेले असल्याने अपिलीय ट्रायब्यूनलने करदात्याच्या उत्पन्नात केलेली वाढ रद्द ठरवली
केसची हकीकत : आयकर विभागाच्या अपिलीय अधिकार्यांनी करदात्याने केलेले खरेदी-विक्रीचे व्यवहार बनावट असल्याचा निष्कर्ष काढून त्याच्या उत्पन्नात वाढ केली. त्याच्या हिशेब वह्यातील नोंदी अॅकोमोडेशन एंट्री असल्याचे प्रतिपादनही अपिलीय अधिकार्यांनी केले. अशा बनावट नोंदीतून करदात्याला कमिशन मिळाल्याचा निर्वाळाही दिला.
ट्रायब्यूनलकडे अपील केले असता ट्रायब्यूनलने करदात्याच्या खरेदी-विक्रीशी संबंधित सर्व कागदपत्रे असल्याने त्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार खरेखुरे असल्याचे स्पष्ट केले. अपिलीय अधिकार्यांनी खुलासा करता येणार नाही अशा क्रेडिट आधारे कलम 68 अंतर्गत केली उत्पन्नवाढ ट्रायब्यूनलने रद्द ठरवली.
करविभागाने हायकोर्टात पिटिशन दाखल केले. हायकोर्टाने ट्रायब्यूनलच्या निष्कर्षाआधारे तसेच सीआयटी वि. पूजा आगरवाल (2018) 99 टॅक्समन.कॉम 451 (राजस्थान हायकोर्ट) चा संदर्भ घेतला व त्या आधारे पिटिशन नामंजूर केले आणि ट्रायब्यूनलच्या निर्णयाचे समर्थन केले.