कर चुकवण्याचा व खोटे जबाब देण्याचा आरोप असलेल्या करदात्याकडे चौकशी केली असता कोणतीही आक्षेपार्ह सामग्री आढळून आली नाही. चौकशी दरम्यान आरोपीस आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही

HomeBlogआयकर / AAYKARकर चुकवण्याचा व खोटे जबाब देण्...

आयकर : न्याय-विनिर्णय-नवनीतम्


कर चुकवण्याचा व खोटे जबाब देण्याचा आरोप असलेल्या करदात्याकडे चौकशी केली असता कोणतीही आक्षेपार्ह सामग्री आढळून आली नाही. चौकशी दरम्यान आरोपीस आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही

केसची हकीकत : कलम २७६ सी अंतर्गत कर चुकवण्याचा गुन्हा तेव्हाच सिद्ध होतो जेव्हा करदात्याने जाणीवपूर्वक कर किंवा दंड चुकवल्याबाबतचा ठोस पुरावा करविभागाकडे असेल त्याचप्रमाणे कलम २७७ अंतर्गत खोटे जबाब दिल्याचा आरोपही भक्कम पुरावा असेल तरच साबित होतो. उपरोक्त आरोपातून करदात्याला ट्रायल कोर्टाने निर्दोष सोडल्यामुळे करविभागाने हायकोर्टात अपील दाखल केले.
हायकोर्टाने या केसमध्ये ट्रायल कोर्टाने करदात्याला निर्दोष घोषित केल्यानंतर २९ वर्षांनी अपील दाखल करण्यात आलेले आहे, जे कायद्यास धरून नाही. अशा प्रकारच्या केसमध्ये करदात्यावर कलम २७६ सी व २७७ अंतर्गत आरोप केलेले असतात. हायकोर्टाच्या असेही “लक्षात आले की, ट्रायल कोर्टाने कायद्याशी सुसंगत पद्धतीने चौकशी करून पुरावे रेकॉर्डवर आणलेले आहेत. करदात्याला आपली बाजू मांडण्याची संधी न देताच त्याच्याविरुद्ध न्यायिक कारवाई केलेली आहे. तसेच अशी कारवाई चालू असतानाच करदात्याविरुद्ध पेनल्टीची कारवाई प्रलंबित होती, जी सर्वतः अनुचित व कायद्याशी विसंगत आहे. अशी पेनल्टी कारवाई कलम २७१(१) अंतर्गत न्यायिक कारवाईसाठी प्रतिकूल ठरते.
हायकोर्टाच्या निरीक्षणाप्रमाणे ट्रायल कोर्टाने कायद्याच्या तरतुदी व उपलब्ध पुरावे यांचे पूर्णत: विश्लेषण करूनच करदात्यास दोषमुक्त केलेले आहे. ट्रायल कोर्टाने मांडलेल्या निरीक्षणांचा व निष्कर्षांचा प्रतिवाद करविभागास करता आला नाही.
उपरोक्त मुद्यांच्या व निरीक्षणाआधारे हायकोर्टाने ट्रायल कोर्टाच्या निर्णयाचे समर्थन करून करदात्यास दोषमुक्त घोषित केले.
[ आयकर अधिकारी (भारत सरकार) वि. नागेंद्रनाथ खुंटिया (२०२३) ४५६ आयटीआर ६३१ (ओडिशा हायकोर्ट) ]

संबंधित पोस्ट :

उत्पन्न दडवून ठेवले किंवा उत्पन्नाचे तपशील चुकीचे दाखल केले या कारणाने करदात्यास आकारलेला दंड व केलेली उत्पन्नवाढ ट्रायब्यूनलने रद्द ठरवली. सुप्रीम कोर्टाने ट्रायब्यूनल व हायकोर्टाच्या निर्णयात कोणताही हस्तक्षेप करण्यास नकार दिला

Tags: No tags
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
Enter Your Mobile No.

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments