HomeBlogsampadkiyLeftसीए. पुरुषोत्तम जी. शर्मा

व्यापारी मित्रचे जनक, सहाय्यक संस्थापक
सीए. पुरुषोत्तम जी. शर्मा,
सीओ. पुरुषोत्तम जी. शर्मा, गेली ४७ वर्षे पुण्यात प्रॅक्टिस करीत आहेत. व्यापारी मित्र मासिकाचे ते सहाय्यक संपादक आहेत. व्यापारी मित्रातर्फे आयोजित आतापर्यंतच्या ९५ ज्ञानसत्रात त्यांनी आयकर, संपत्तीकर, टॅक्स प्लॅनिंग यावर मार्गदर्शन केलेले आहे. विविध व्यापारी संघटनांमध्ये आयकरासंबंधी त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत. विविध ठिकाणी त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. अ. भा. खांडल विप्र शिक्षण फंड ट्रस्टचे ते कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्याचप्रमाणे ‘उमेद परिवार‘ या सेरेब्रल पाल्सी व मतिमंद मुलांच्या संस्थेचे ते फाऊंडर ट्रस्टी आहेत. त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीत उमेद परिवाराने वडकीनाला, सासवड रोड येथे ‘अरविंद सौरभ’ या नावाने मुलांचे पुनर्वसन केंद्र सुरू केले आहे. सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन या सेरेब्रल पाल्सीसाठी सुरू झालेल्या शाळेचे ते फाऊंडर ट्रस्टी आहेत. विविध सामाजिक उपक्रमातही त्यांचा सहभाग आहे.