HomeBlogजीएसटी / GSTशोकॉज नोटीस व नोंदणी रद्द करणा...

जीएसटी : न्याय-विनिर्णय-नवनीतम्
शोकॉज नोटीस व नोंदणी रद्द करणारा आदेश अवैध ठरवला
केसची हकीकत : करदात्याला कोणतेही ठोस कारण न देता कारणे दाखवा नोटीस बजावून त्यानंतर त्याची नोंदणी रद्द ठरवण्यात आली, जे नैसर्गिक न्यायाशी विसंगत आहे.
हायकोर्टाच्या निरीक्षणाप्रमाणे शोकॉज नोटिशीत प्रस्तावित कारवाईचे कोणतेही कारण नमूद नव्हते. त्यामुळे अशा मोघम नोटिशीला काय उत्तर द्यावे याबाबत करदाता संभ्रमित होतो. शोकॉज नोटीस यांत्रिकपणे देणे नियमबाह्य आहे. शोकॉज नोटिशीतील मजकूर नैसर्गिक न्यायाशी सुसंगत असावा. मात्र तो प्रस्तुत केसमध्ये विसंगत आढळून आला. शोकॉज नोटिशीचा उद्देशच मुळी करदात्याला त्याचे आरोप दाखवणे व त्यासाठी त्याच्याकडून उत्तर प्राप्त करणे असतो. मात्र प्रस्तुत केसमध्ये हे दिसून येत नाही. त्यामुळे करदात्याला बजावलेली शोकॉज नोटीस वरील निकष पूर्ण करीत नाही.
हायकोर्टाने शोकॉज नोटीस व नोंदणी रद्द करणारा आदेश अवैध ठरवला.