HomeBlogजीएसटी / GSTअपील दाखल करण्यास झालेला विलंब...

जीएसटी : न्याय-विनिर्णय-नवनीतम्
अपील दाखल करण्यास झालेला विलंब माफ करण्यात आला
प्रश्न 53 : पिटिशनर आजारी असल्याने अपिलीय अधिकार्यांकडे विहित मुदतीत अपील करणे शक्य झाले नाही. त्यासाठी त्याने वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले. अपील करण्याची मुदत तीन महिन्यांनंतर 30 दिवस नियमाप्रमाणे असली तरी अपिलीय अधिकार्यांनी त्या मुदतीनंतर निर्णय देऊ नये, असे त्या नियमात कुठेही नमूद नाही. भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 226 अंतर्गत अपिलीय अधिकारी प्रस्तुत केसमधील खरी वस्तुस्थिती पाहून त्यानुसार मुदतवाढ देऊ शकतात. अपिलीय उपाय या परिस्थितीत महत्त्वाचे समजले जात असल्याने त्यांनी तसा निर्णय घेणे अपरिहार्य असतानाही तो घेतल्याचे दिसत नाही.
हायकोर्टाने वरील मुद्यांच्या आधारे अपिलास झालेला विलंब माफ केला.