HomeBlogसंपादकीय / Sampadkiyव्यापारी बंधूंनी घ्यावयाची दक्...
व्यापारी बंधूंनी घ्यावयाची दक्षता
(1) ऑगस्ट महिन्यात आयकरासंबंधी करावयाची कामे
दिनांक पर्यंत कामाचा तपशील
7 ऑगस्ट
- जुलै 2023 मध्ये मुळातून करकपात (टीडीएस) व मुळातून करवसुली (टीसीएस) केलेली रक्कम भरण्याची शेवटची तारीख. चलन नं. आयटीेएनएस – 281 मध्ये.
14 ऑगस्ट
- जून 2023 मध्ये कलम 194आयए प्रमाणे स्थावर मालमत्ता खरेदी करताना मुळातून करकपात केलेल्या रकमेचे टीडीएस सर्टिफिकेट फॉर्म नं. 16बी मध्ये द्यावे.
- जून 2023 मध्ये कलम 194आयबी प्रमाणे व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबाने भाडे देताना मुळातून करकपात केलेल्या रकमेचे टीडीएस सर्टिफिकेट फॉर्म नं. 16सी मध्ये द्यावे.
- जून 2023 मध्ये कलम 194एम प्रमाणे व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबाने ठेकेदाराला किंवा व्यावसायिकाला रक्कम देताना मुळातून करकपात केलेल्या रकमेचे टीडीएस सर्टिफिकेट फॉर्म नं. 16डी मध्ये द्यावे.
15 ऑगस्ट
- जून 2023 ला संपणार्या तिमाहीचे (पगारा व्यतिरिक्त) टीडीएस सर्टिफिकेट फॉर्म नं. 16ए मध्ये देण्याची तारीख 15 ऑगस्ट होती ती वाढवून 15 ऑक्टोबर करण्यात आलेली आहे.
कामगार कायदे
- जुलै 2023 या महिन्याचा प्रॉव्हिडंड फंड भरण्याची शेवटची तारीख.
- जुलै 2023 या महिन्याचा ई.एस.आय. भरण्याची शेवटची तारीख.
30 ऑगस्ट
- जुलै 2023 मध्ये कलम 194आयए प्रमाणे स्थावर मालमत्ता खरेदी करताना मुळातून करकपात केलेल्या कराचे चलन-कम-स्टेटमेंट फॉर्म नं. 26क्यूबी मध्ये दाखल करण्याची शेवटची तारीख.
- जुलै 2023 मध्ये कलम 194आयबी प्रमाणे व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबाने भाडे देताना मुळातून करकपात केलेल्या कराचे चलन-कम-स्टेटमेंट फॉर्म नं. 26 क्यूसी मध्ये दाखल करण्याची शेवटची तारीख.
- जुलै 2023 मध्ये कलम 194एम प्रमाणे व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबाने ठेकेदाराला किंवा व्यावसायिकाला रक्कम देताना मुळातून करकपात केलेल्या कराचे चलन-कम-स्टेटमेंट फॉर्म नं. 26 क्यूडी मध्ये दाखल करण्याची शेवटची तारीख.
31 ऑगस्ट
- ज्या सार्वजनिक संस्थेनी फॉर्म 9ए आणि 10 दाखल करावयाचा आहे त्यांच्यासाठी शेवटची तारीख
2. ऑगस्ट महिन्यात जीएसटी/व्यवसायकरासंबंधी करावयाची कामे
दिनांक पर्यंत कामाचा तपशील
फॉर्म जीएसटीआर-1 [ जुलै २०२३ साठी ]:-
11 ऑगस्ट
- उलाढाल 5 कोटीच्या वर असल्यास किंवा मासिक पत्रक भरण्याचा पर्याय स्वीकारल्यास.
13 ऑगस्ट
- 50 लाखापर्यंतची बी 2 बी सर्व बिले
फॉर्म जीएसटीआर-3बी [ जुलै २०२३ साठी ]:-
20 ऑगस्ट
- मागील आर्थिक वर्षातील उलाढाल 5 कोटीच्या वर असल्यास किंवा मासिक पत्रक स्वीकारल्यास.
22 ऑगस्ट
- मागील आर्थिक वर्षातील उलाढाल 5 कोटीच्या आत असल्यास किंवा मासिक पत्रक स्वीकारल्यास.
25 ऑगस्ट
- तिमाही पत्रक भरण्याचा पर्याय स्वीकारल्यास. (जीएसटी पेमेंटसाठी)
31 ऑगस्ट
- 2022-23 ची करदेयता 1 लाखापेक्षा जास्त असल्यास व्यवसायकराचे ऑगस्टचे मासिक पत्रक भरा.