HomeBlogजीएसटी / GSTजीएसटी – सर्क्युलर / नोट...
जीएसटी - सर्क्युलर / नोटिफिकेशन्स / सूचना (महत्त्वाचे)
जीएसटी नोंदणी अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे
[ इन्स्ट्रक्शन नं. 3 (2023) ता. 14.6.2023 ]
बनावट नोंदणीदाखला आणि इनपुट टॅक्स क्रेडिट पास करण्यासाठी बोगस पावत्या जारी करणे ही गंभीर समस्या बनली आहे. ज्यामध्ये फसवणूक करणारे संशयास्पद आणि गुंतागुंतीचे व्यवहार करतात ज्यामुळे?शासकीय महसूल हानी होत आहे.
वरील अनुषंगाने जीएसटी अधिकार्यांनी नोंदणी अर्जाबाबत कशा पद्धतीने मार्गदर्शक तत्त्वे अवलंबावीत याकरता काढलेली सूचना नवीन नोंदणी घेणार्या व्यापार्यांसाठीही उपयुक्त आहे. यामध्ये प्रामुख्याने नोंदणी करताना
- व्यापार्याने दिलेल्या व्यवसायाच्या पुराव्याची?शासकीय अधिकारी विविध माध्यमांद्वारे (जसे संकेतस्थळ, जमीन नोंदणी, वीज वितरण कंपनी, नगर पालिका, स्थानिक स्वराज्य संस्था) तपासणी करू शकतात.
- पॅनबाबतही विविध राज्यांतर्गत पॅनबाबतीत रेकॉर्ड, त्या अनुषंगाने नोंदणी रद्द केली आहे का? पॅन नाकारला आहे का? पॅन संशयास्पद वाटतो का? याबाबत छाननी होणार आहे.
- नोंदणी अर्ज प्रक्रिया करताना किंवा नोंदणी अर्जात आधार प्रमाणीकरण केले असेल किंवा नसले तरीही योग्य अधिकार्याद्वारे त्याची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.
- नोंदणी संबंधित कोणताही निष्काळजीपणा आढळल्यास अधिकार्यावर कठोर भूमिका घेतली जाऊ शकते. उदा. नोंदणी स्वीकारणे/नाकारणे, नोंदणी संबंधी प्रश्न उपस्थित करणे किंवा कारवाई करणे इ.
या सूचनेअनुसार फसवणुकी अन्वये नोंदणी घेण्याबाबत आळा बसू शकेल व नोंदणी घेतानाचा व्यापार्यांचा निष्काळजीपणाही पुढे येऊन, पुढील शासकीय कारवाईसाठी संबंधित व्यापारी पात्र ठरू शकेल.
विस्तृत माहितीसाठी संबंधितांनी cbic.gov.in संकेतस्थळावरील जीएसटी हेड अन्वये इन्स्ट्रक्शन्स खालील माहिती पहावी.