आर्थिक घडामोडींचा वेध
भागीदारी करार
भारतीय स्वदेशी ई-कॉमर्स कंपनी “फ्लिपकार्टने”; खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या अॅॅक्सिस बँकेसोबत आपल्या ग्राहकांसाठी वैयक्तिक कर्जे वाटप सुलभ करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी केली आहे. याचा 450 दशलक्ष ग्राहकांना फायदा मिळेल. सादर करण्यात आलेली वैयक्तिक कर्ज सेवा कार्यक्षम कर्ज पर्याय सादर करते, 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेपर्यंत मंजुरी देते. त्यामुळे ग्राहकांना 6 ते 36 महिन्यांपासून लवचिक परतफेड चक्र मिळेल. फ्लिपकार्टची वैयक्तिक कर्जाची सुविधा आजच्या आर्थिक वातावरणात ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि डिजिटल कर्ज देण्याच्या संभाव्यतेचा लाभ घेण्याबाबतची आपली बांधिलकी दर्शवते. ही माहिती फ्लिपकार्टच्या फिनटेक आणि पेमेंट्स ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. धीरज अनेजा यांनी दिली.
वेस्टसाइडचे 222वे स्टोअर पुण्यात
विनिता गेरा “सीपी” च्या पहिल्या महिला अध्यक्षा
पुण्याच्या श्रीमती विनिता गेरा यांची द सॉफ्टवेअर एक्सपोटर्स असोसिएशन ऑफ पुणे अर्थात “सीप”च्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सदर निवड घोषित करण्यात आली आहे. श्रीमती विनिता गेरा यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध माहिती तंत्रज्ञान संस्थांमधील कामकाजाचा तब्बल 27 वर्षांचा अनुभव आहे. त्यांचा कार्यकाळ 2023 ते 2025 असा दोन वर्षांचा असेल. श्रीमती विनिता गेरा यांनी पुणे विद्यापीठामधून संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबाद आणि आयआयएम कोलकाता येथून अनेक अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. 1998 साली पुण्यातील सॉफ्टवेअर निर्यातदारांची संघटना म्हणून ‘सीप’ची स्थापना करण्यात आली.
मेटाच्या थ्रेडसवर लाखोंच्या उडया
ट्विटर या समाजमाध्यमाशी थेट स्पर्धा करणारे थ्रेडस हे नवीन समाजमाध्यम फेसबुक व इंस्टाग्रामची मालकी असणार्या मेटाने नुकतेच कार्यान्वित केले. इलॉन मस्क यांच्याकडे मालकी गेल्यापासून ट्विटर वापरकर्ते वैतागलेले आहेत. या पार्श्वभूमीवर तरुणाईला आकर्षित करण्यासाठी थ्रेडस हे शब्द संवादावर भर देणारे व्यासपीठ सुरु करण्यात आले आहे. याच्या शुभारंभाच्या दिवशी जगभरातील सव्वा दोन कोटी ग्राहकांची या अॅपवर नोंदणी केली आहे. ट्विटर सारखीच मांडणी असणार्या थ्रेडसचे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे त्यात एका पोस्टसाठी 500 शब्दांची मर्यादा असणार आहे. युरोपियन महासंघाचे डेटा गोपनीयतेचे बाबत कठोर नियम असल्याने हे अॅप युरोपात सुरु झालेले नाही. भारतात या नवीन समाजमाध्यमाला मोठी मागणी आहे.
ऑनलाईन गेमिंग, कॅसिनोवर 28 टक्के जीएसटी
आयकरदाते व डीमॅट खातेदारांची संख्या वाढली
जगात सर्वाधिक लोकसंख्या म्हणून ओळखल्या जाणार्या आपल्या देशात आयकरदात्यांची (Income Tax Payer) आणि डीमॅट खातेदारांची संख्या सतत वाढत आहे. एकूण लोकसंख्येचा (140 कोटी) विचार केला तर व्यक्तिगत आयकरदात्यांची संख्या ही 2020-21 अखेर 6 कोटी 33 लाख इतकी होती तर डीमॅट खातेदारांची संख्या एप्रिल 23 अखेर 11 कोटी 50 लाखाच्या आसपास होती. या 6 कोटी आयकरदात्यांपैकी 48 लाख करदाते हे 30 टक्के दराने आयकर भरतात. प्रसिद्ध अभिनेता श्री. अक्षयकुमार आणि क्रिकेटर श्री. महेंद्रसिंग धोनी हे सर्वाधिक आयकर भारतात. रिलायन्स, टीसीएस, एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि ओएनसीजी या कंपन्या सर्वाधिक कर भरतात. देशातील सर्वाधिक करदात्यांची संख्या ही महाराष्ट्र, मुंबई येथे असून त्या खालोखाल दिल्ली, बंगलोर, चेन्नई, कोलकाता, हैद्राबाद, अहमदाबाद आणि पुण्याचा नंबर लागतो. सर्वाधिक डीमॅटखाती देखील महाराष्ट्रात असून त्यानंतर गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, दिल्ली या राज्यांचा क्रमांक लागतो.