HomeBlogआयकर / AAYKARभाडे उत्पन्न आणि टीडीएस (कलम १...
"भाडे" म्हणजे काय ? या संदर्भात स्पष्टीकरण :-
भाडे म्हणजे केवळ इमारत भाडे नसून खालील नमूद केलेल्या वेगवेगळ्या मालमत्ता किंवा वस्तू वापरण्यासाठी जो मोबदला, पेमेंट, कोणत्याही नावाने, कोणत्याही भाडेपट्ट्याने, सब-लीज, भाडेकरार किंवा इतर कोणत्याही कराराखाली, किंवा व्यवस्थेअंतर्गत दिला जातो.
- जमीन; किंवा
इमारत (कारखान्याच्या इमारतीसह); किंवा
इमारतीला (कारखान्याच्या इमारतीसह) जमीन देणे; किंवा
- यंत्रसामुग्री; किंवा
प्लांट (plant); किंवा
उपकरणे; किंवा
फर्निचर; किंवा
- फिटिंग्स
- प्रायव्हेट आणि पब्लिक लिमिटेड कंपनी तसेच वन पर्सन कंपनी (OPC)
- पार्टनरशिप फर्म (नोंदणीकृत असो वा नसो)
- लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म
- मागील आर्थिक वर्षात आयकर कायद्यानुसार टॅक्स ऑडिट लागू असलेले वैयक्तिक करदाते (Individual) / प्रोप्रायटरी फर्म आणि हिंदू अविभक्त कुटुंब करदाते (HUF)
- असोसिएशन ऑफ पर्सन (AOP) ,बॉडी ऑफ इंडिविडुअल (BOI)
- सार्वजनिक विश्वस्तसंस्था, सोसायटी ,सहकारी संस्था
- कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ अंतर्गत नोंदणीकृत झालेली विश्वस्त कंपनी (Section 8 Company )
- स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत, नगरपालिका,नगरपंचायत,नगरपालिका आणि महानगरपालिका
- विद्यापीठ
- सरकारी संस्था जसे की एलआयसी, सेबी, विविध महामंडळे
- गृहनिर्माण किंवा शहर विकास प्राधिकरण जसे की HUDCO ,CIDCO
- भारतात स्थापन झालेल्या परदेशी संस्था ,कंपन्या, आणि बॉडी कॉर्पोरेट
- केंद्र किंवा राज्य सरकार,
- केंद्र, राज्य किंवा प्रांतिक कायद्याद्वारे किंवा अंतर्गत स्थापन केलेले कोणतेही निगम
देयकाचे स्वरूप Nature of Payment | थ्रेशहोल्ड मर्यादा (Threshold Limit) | TDS कपातीचे दर (Rate of TDS) | प्राप्तकर्त्या व्यक्तीचा PAN नसेल तर, TDS कपातीचे दर (TDS Rate if PAN of Payee is not available) |
---|---|---|---|
कोणतीही मशिनरी किंवा इतर सामग्री किंवा प्लांट किंवा कोणतेही उपकरण वापरण्यासाठी देय असलेले भाडे किंवा शुल्क | रु २,४०,००० प्रति वर्ष / वार्षिक | २% | २०% |
कोणतीही जमीन किंवा इमारत (कारखान्याच्या इमारतीसह) किंवा किंवा फर्निचर किंवा फिटींगचा वापर करण्यासाठी देय असलेले भाडे किंवा शुल्क. | रु २,४०,००० प्रति वर्ष / वार्षिक | १०% | २०% |
- बिल किंवा देयकाची नोंद लेखा पुस्तकामध्ये (Book of Accounts) केलेली तारीख किंवा
- पेमेंट केलेली तारीख
- निर्धारित वेळेत, कपात केलेल्या टीडीएस ची रक्कम, आयकर विभागाला जमा करणे –
- निर्धारित वेळेत, टीडीएस विवरणपत्र फॉर्म 26 Q नमुन्यात (TDS Return) दाखल करणे
- प्राप्तकरत्या व्यक्तीला,फॉर्म 16A नमुन्यात , टीडीएस कपातीचे प्रमाणपत्र जारी करणे
- जर प्राप्तकर्ता सरकार असेल तर भाड्याच्या उत्पन्नावर टीडीएसची कपात करण्याची आवश्यकता नाही
- भाडेकरू कडून गोळा केलेली अनामत रक्कम :-
iii>. हॉटेल्सना देण्यात येणारे रूम चार्जेस –`वैयक्तिक करदाते (Individual) आणि हिंदू अविभक्त कुटुंब करदाते (HUF) वगळता इतर करदात्यानी हॉटेलमध्ये नियमित पणे घेण्यात येणाऱ्या निवासासाठी द्याव्या लागणाऱ्या शुल्कावर (Hotel Accommodation Charges), कलम १९४ आय अंतर्गत टीडीएसची कपात करणे आवश्यक आहे.
iv>. बँक्वेट हॉल (Banquet Hall) भाड्याने घेणे –`हॉटेलमध्ये खोल्या आणि बँक्वेट हॉल अर्थात मेजवानी हॉल/दालन भाड्याने घेण्यासाठी दिलेल्या चार्जेस वर कलम १९४ आय अंतर्गत टीडीएसची कपात करणे आवश्यक आहे.तसेच कॅटरिंग सेवेचा लाभ घेण्यासाठी दिलेल्या चार्जेस वर १९४ सी कलमा अंतर्गत टीडीएस लागू होतो.- (संदर्भ – Hero Moto Corp Ltd. v Addl. CIT (2013) 36 taxmann.com 103/60 SOT 25 (URO) -Delhi Tribunal)
vi>. वाहन भाडे –`वाहन भाड्याने घे कलम १९४ सी च्या कक्षेत येत नाही. त्यामुळे कलम १९४ आय अंतर्गत टीडीएसची कपात करावी लागेल .(CIT v Pioneer Personalized Holidays (P.) Ltd (2018) 92 taxman.com 107-Kerala)
vi>. लँडिंग आणि पार्किंग शुल्क –`भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या लँडिंग शुल्क आणि पार्किंग शुल्कासाठी एअरलाइन कंपनीने देय असलेली रक्कम ही भाड्याच्या स्वरूपाची असते म्हणून अश्या चार्जेसवर कलम १९४ सी अंतर्गत टीडीएसची कपात होत नसून त्यावर १९४ आय या कलमांतर्गत, एअरलाइन कंपनीने टीडीएसची कपात करणे आवश्यक आहे. (CIT v.Asina Airlines (2008) 175 TAxman 177 (Delhi).परंतु मद्रास उच्च न्यायालयाने CIT. Vs Singapure Airlines Lts.(2012) 24 taxmann.com 200 याबाबत विपरीत निकाल दिला आहे .
vii>. खालील केसेस मध्ये कलम १९४ आय अंतर्गत टीडीएसची कपात करणे आवश्यक नाही-`
a) पालिकेचा कर (Municipal Taxes), जमिनीचे भाडे (Ground Rent) जर भाडेकरूने स्वतंत्रपणे भरलेले असतील तर, हे उत्पन्न नसल्यामुळे यावर १९४ आय अंतर्गत टीडीएसची कपात करणे आवश्यक नाही.(संदर्भ – परिपत्रक क्र. ७१८ दिनांक २२/०८/१९९५)
b) होर्डिंग्जवरील जाहिराती- जमिनीच्या पातळीपासून वर उभारण्यात आलेल्या होर्डिंगवर जाहिरात लावण्यासाठी जे चार्जेस दिले जातात त्यावर 194C या कलमांतर्गत टीडीएसची कपात करणे आवश्यक आहे. Hete Graphics v ITO (2011) 45 SOT 456/10 taxmann.com 154 (Ahd. – Trib.).
c) शीतगृहाला दिलेले कुलिंग चार्जेस (Cooling Charges to Cold Storage)- शीतगृहाचे मुख्य कार्य यांत्रिक प्रक्रियेद्वारे नाशवंत वस्तूंचे जतन करणे हे आहे आणि अशा वस्तूंचा साठा केवळ आनुषंगिक आहे. शीतग्रहांमध्ये ग्राहकाला कोणतीही विशिष्ट जागा किंवा शीतग्रहाची मशिनरी वापरण्याचा अधिकार दिलेला नसतो. त्यामुळे ग्राहक इथे भाडेकरू होत नाही. या अनुषंगाने शीतगृहाला दिलेल्या कुलिंग चार्जेसवर कलम १९४ आय अंतर्गत टीडीएसची कपात होत नसून त्यावर 194C या कलमांतर्गत टीडीएसची कपात करणे आवश्यक आहे. (Ganesh Alu Bhandar v ITO (2003) 87 ITD 588 (Rajkot – Trib.) NOTOS VIS 194(I))