HomeBlogआयकर / AAYKARटीडीएसची ए, बी, सी, डी [ लेख-1...
टीडीएस हा वेगळा कर नसून तो आयकरच
उदाहरण – एबीसी प्रा.लि. नावाची कंपनी आहे. या कंपनीला 1 लाख रुपये व्यावसायिक फी म्हणून श्रीमती मीनल बोटके यांना देणे आहे. समजा टीडीएस कपातीचा दर 10% आहे असे गृहीत धरू. आता संबंधित एबीसी प्रा.लि. कंपनी (म्हणजेच Payer/Deductor) 1 लाख रुपयामधून 10% दराने म्हणजेच 10,000 रुपये टीडीएसची कपात करेल आणि उर्वरित रक्कम म्हणजेच 90 हजार रुपये श्रीमती मीनल बोटके यांना अदा करेल. कपात केलेली 10,000 रुपये कंपनी आयकर विभागाला जमा करेल. तसेच श्रीमती मीनल बोटके यांना फॉर्म 16 ए च्या नमुन्यात टीडीएस सर्टिफिकेट जारी करेल. श्रीमती मीनल बोटके जेव्हा वार्षिक आयकर विवरण पत्र दाखल करतील तेव्हा त्यांना 10,000 रुपयाचे टॅक्स क्रेडिट मिळेल म्हणजेच त्यांना जो एकूण आयकर भरणा असेल त्यामधून हे 10,000 रुपये वजा होतील.
- टीडीएस कपातीसाठी जबाबदार व्यक्ती / कपात करणारी व्यक्ती अर्थात टीडीएस कोणी (व्यक्ती, संस्था, फर्म) कपात करायचा – Deductor
उत्पन्नाची प्राप्तकर्ता व्यक्ती – Deductee
पेमेंट किंवा देयकाचे स्वरूप ज्याच्यावर टीडीएस लागू आहे (Nature of Payment)
- टीडीएस कपातीसाठी पेमेंटची/देयकाची किमान मर्यादा – (Threshold Limit)
टीडीएस कपात करण्याची वेळ – When to Deduct टीडीएस
टीडीएस कपातीचा दर -टीडीएस रेट
इतर मुद्दे, लागू असतील तर – Other Special Points-
टीडीएस कपात करणार्या व्यक्तीच्या जबाबदार्या (Responsibilities of Deductor)
1) निर्धारित वेळेत, कपात केलेल्या टीडीएस ची रक्कम, आयकर विभागाला जमा करणे :
2) टीडीएस विवरणपत्र (टीडीएस Return) दाखल करणे :
अ) टीडीएस आयकर विभागाला भरल्यानंतर टीडीएसचे त्रैमासिक विवरणपत्र (टीडीएस Return) आयकर विभागाला दाखल करणे आवश्यक आहे. कपात केलेल्या टीडीएसची परिपूर्ण माहिती दिलेली असते जसे की उत्पन्नाच्या प्राप्तकर्त्याचे नाव, त्याचा पॅन क्रमांक, बिल किंवा पेमेंटची रक्कम, बिलाचे/ पेमेंटचे स्वरूप इत्यादी. हे त्रैमासिक विवरणपत्र दाखल केल्यानंतरच प्राप्तकर्त्यास टीडीएसचे क्रेडिट घेता येते.
ब) पेमेंट किंवा देयकाच्या स्वरूपानुसार, टीडीएसचे विवरणपत्र हे तीन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये दाखल केले जाते.
देयकाचे स्वरूप | फॉर्म क्रमांक |
वेतन किंवा पगारात कपात केलेल्या टी डी एस चे विवरण पत्र | २४ क्यू |
वेतन सोडून इतर सर्व देयके (अनुक्रमांक १ आणि ३ या प्रकारातील देयक सोडून ) | २६ क्यू |
भारताबाहेर पाठवलेल्या पेमेंट किंवा देयकावरील टी डी एस चे विवरण पत्र याठिकाणी प्राप्तकर्ता अनिवासी भारतीय, परदेशी कंपन्या किंवा परदेशस्त व्यक्ती असू शकतो | २७ क्यू |
क) कपात केलेला टीडीएस आयकर विभागाकडे जमा करण्यासाठी आणि त्याची टीडीएसचे विवरणपत्र दाखल करण्यासाठी प्रत्येक कपात करणार्या व्यक्तीकडे टॅन नंबर म्हणजेच Tax Deduction Account Number असणे आवश्यक आहे .
ड) टीडीएसचे त्रैमासिक विवरणपत्र वेळेत दाखल करणे खूप आवश्यक आहे कारण ते वेळेत दाखल नाही केले तर रुपये 200 प्रति दिवस एवढा विलंब शुल्क आयकर कायदा अंतर्गत आकारला जातो.