वाचकांचे अभिप्राय

'व्यापारी मित्र' मधील माहितीचा उपयोग सरकारी अधिकाऱ्यांनाही होतो

मी मागील ३-४ वर्षांपासून 'व्यापारी मित्र' चा वर्गणीदार आहे. 'व्यापारी मित्र' मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या अभ्यासपूर्ण लेखांचा फायदा व्यापारी वर्गाबरोबरच विक्रीकर / कर्मचाऱ्यांना देखील होतो. शिवाय आयकर, सेवाकर याबाबत चे ज्ञान अद्यावत होतो. पत्र लिहण्याचे विशेष कारण असे की, मागील वर्षात माझी वर्गणी भरण्याची मुदत संपली. कार्य बाहुल्यामुळे मी जवळ जवळ तीन महिनेपर्यंत वर्गणी भरू शकलो नाही. तरीदेखील मला मिळणाऱ्या एकाही अंकामध्ये खंड पडला नाही हे विशेष. 'व्यापारी मित्र' केवळ अर्थ प्राप्तीसाठी चालविले जात नाही तर 'ज्ञानवृद्धी' हे त्याचे प्रमुख उद्धिष्ट आहे. हेच यावरून सिद्ध होते. आपल्या सहकार्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
आपले प्रतिनिधी श्री. आर. एल. ढमाले व श्री. आर. एल. एकबोटे यांचे देखील कायम मैत्रीपूर्ण सहकार्य लाभत असते त्याबद्दल आभार. आनंद मुगोळकर, विक्रीकर अधिकारी, हिंगोली. मोबा: ९४२२१८८९६०

डॉ. लुणावत यांचा लेखाने व औषधोपचाराने जुनाट एसीडिटीचे दुखणे पूर्ण बरे झाले

जुलै २०१३ च्या 'व्यापारी मित्र' मध्ये डॉ. भारत लुणावत यांचा आलेला एसीडिटी (आम्लपित्त) वरील लेख वाचला. गेल्या १०-१२ वर्षांपासून मला असलेली एसीडिटी इतकी त्रासदायक झाली होती की मी फक्त एकच वेळ जेवायचे आणि तरीसुद्धा दिवस-रात्र मला त्रास व्हायचा. लुणावत डॉक्टरांचा लेख वाचून मी त्यांना भेटले. माझी समस्या सांगितली आणि एवढ्या वर्षांचं दुखणे त्यांनी ६-७ महिन्यात पूर्ण बरे केले. त्यांनी मला स्वतः तयार केलेली आयुर्वेदिक औषधे दिली आणि ताक पदार्थ वज्र्य करायला सांगितला. तसेच मला १४ दिवसांसाठी बस्तीचा कोर्सही दिला. नियमित औषधे व बस्तीमुळे मला खूप बरे वाटू लागले. मी ४ महिन्यानंतर ताकही पिऊन पाहिले आणि मला काहीच त्रास झाला नाही. थोडक्यात जळजळ आणि एसीडिटीचा त्रास पूर्णपणे थांबला आहे. सौ. भाग्यरेखा अशोक जोशी, नांदगांव, ता. मुरुड, जि. रायगड

विविध माहितीने परिपूर्ण 'व्यापारी मित्र'

व्यापारी मित्र मासिकाचा मी जुना वर्गणीदार आहे. उपयोगी माहिती परिपूर्ण, दर्जाशी कोणतीही तडजोड न करता वाजवी किमतीने मासिक देण्याचा आपला प्रयत्न स्तुत्य व प्रशंसनीय आहे. अनुक्रमणिकेप्रमाणे एकदा अंकावर नजर टाकली की दुसरा अंक कधी येतो याची मी वाट पाहत असतो. जी. एस. टी. ची अंमलबजावणी झाल्यानंतरसुद्धा आपण अशीच विविध उपयोगी सदरे चालू ठेवाल असा विश्वास वाटतो. मी ५ वर्षांची वर्गणी पाठवली आहे. पी. बी. पाटील अँड असोसिएट्स, नवी मुंबई मोबा: ९३२४४०८२४०

"चेक" लेख आवडला...

श्री. जी. डी. शर्मा, संस्थापक संपादक - यांस सप्रेम नमस्कार आपण आपल्या व्यापारी मित्र मासिकाच्या डिसेंबर अंकात, माझा 'चेक' हा लेख प्रसिद्ध केला. तो लेख अनेकाना आवडला असे फोन मला येत आहेत. आजपर्यंत मला ठाणे, मुलुंड, धुळे, नंदुरबार, आंबेजोगाई, परळी वैजनाथ इ. ठिकाणांहून फोन आले. मुलुंडहून फोन करणाऱ्या गृहस्थानी कळवले की, ते तेथील ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते असून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सभेत या लेखाचे वाचन करण्यात आले. परळी वैजनाथच्या वाचकांनी कळविले की, त्याने त्याच्या मुलाच्या शाळेत या लेखाचे वाचन केले व त्यामुळे अनेकांना स्फूर्ती मिळाली. माझ्या लेखाला मिळालेल्या या प्रतिसादामुळे मी भारावून गेलो आहे. यावरून आपले व्यापारी मित्र मासिक हे कोठे - कोठे जाते व कसे आवडीने वाचले जाते याची कल्पना आली. माझे लेख आपण व्यापारी मित्रमधून प्रसिद्ध करून माझ्यासारख्या एका 'नव' लेखकाला जे प्रोत्सहन देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
धन्यवाद ! श्री. उल्हास हरी जोशी, मोबा: ९२२६८४६६३१

६६ वर्षांचा व्यापारी मित्र प्रवास थक्क करणारा !

ग्रंथालय व माहितीशास्त्र पदविकास अभ्यासक्रमासाठी प्रकल्प करताना मी आपल्या मासिकाची निवड केली. प्रकल्पासाठी अभ्यास करताना मासिकाच्या स्थापनेपासूनची सर्व माहिती मला आवश्यक होती. आपल्या कार्यालयातून मला सर्वतोपरी माहिती पुरविण्यात आली त्याबद्दल मी आपली आभारी आहे.
"व्यापारी मित्र" विषयी थोडेसे...
"व्यापारी मित्र हे मासिक व्यापाऱ्यांना सर्व माहिती देणारे आहेच परंतु इतर वाचकांना व्यापारी होण्यासाठी, व्यापार करण्यासाठी उपयुक्त करणारे आहे. व्यापाराची सुरुवात कशी करावी, त्याचे व्यवस्थापन कसे करावे, इनकमटॅक्स, सेल्सटॅक्स, व्हॅट याबद्दलची सर्व माहिती अगदी बिनचूक आणि तपशीलवार मिळते. प्रा. शेजलवारकरांसारख्या मान्यवर व्यक्तिमत्वाचे विचार या मासिकातून वाचता येतात. याशिवाय विविध लेख, व्यक्तिपरिचय यासारख्या सदरांमधून मान्यवर व्यक्तींची जडणघडण आताच्या शब्दात सांगायचं "स्ट्रगल" वाचता येते. खूप काही शिकायला मिळते. गेल्या ६६ वर्षातील "व्यापारी मित्र" चा प्रवास थक्क करण्यासारखा आहे. एवढी वर्षे सातत्याने व्यापारविषयक सर्व माहिती संगोपांग देणे हे सोपे काम नाही. परंतु आपण हे शिवधनुष्य पेललेत याबद्दल खरंच खूप आभार. सौ. ऋतुजा उमेश कुलकर्णी, रत्नागिरी. मोबा: ९८२२९८३९५९

व्यापारी मित्राकडून ४० वर्षात चांगले शिकायला मिळाले!

मी आपल्या 'व्यापारी मिञ' मासिकाचा १९७५ पासून वर्गणीदार आहे. याचा मला अभिमान आहे. आजपावेतो मला माझा या खास मित्राकडून ४० वर्षात भरपूर चांगले शिकायला मिळाले. व्यापारी मित्राच्या माध्यमातून कर/ व्यापार/ अन्य कायदे/ अध्यात्म/ आरोग्य इ. अनेकविध विषयांवरचे ज्ञान व त्याबद्दलचे सामाजिक भान वाढवण्याचे अखंड व्रत जणू आपण घेतले आहे. ( शिवशक्ती सिमेंट पाईप इ., प्रा. लि. )
विजय ताराचंद बडजाते कोपरगांव, मोबा: ९८२२२७५५५०

आरोग्य विषयक लेख वाचनीर असतात!

मी आपल्रा मासिकाचा गेली 20 वर्षे सभासद आहे व निरमित आपले मासिक वाचतो. आपल्रा मासिकातील “आरोग्य विभागात” आपण चांगल्रा लेखकांची आरोग्य विषरक माहिती छापत असता, ती अतिशर वाचनीर असते. ऑगस्ट 2015 मधील डॉ.सुभाषचंद्र मालाणी रांचा “आजारपण का रेते? (पान 77) ” हा लेख वाचनीर होता. ऑगस्ट 2015 मधील लेखातील माहितीप्रमाणे मी डॉ.मालाणी रांना फोनवरून माझा शारीरिक त्रास व व्रथा सांगितली व त्रांच्रा सल्ल्रानुसार व त्रांच्रा मार्गदर्शनाने मी दोन महिने औषधोपचार केला व मला फार बरे वाटू लागले आहे. निसर्गोपचाराने आपण आपल्रा व्राधींवर चांगल्राप्रकारे इलाज करू शकतो, अशी माझी खात्री झालेली आहे. रासाठी मी डॉ.मालाणी रांचा आभारी आहे. आपल्रा मासिकाला माझ्रा हार्दिक शुभेच्छा.
श्री. संभाजी नारडू,रा.कात्रज, पुणे. मोबा:9421437843

व्यापारी मित्राचे कार्य अखंड चालू राहो!

आपला अंक मला पोस्टाने प्रत्रेक महिन्रास मिळत आहेच. तो सर्व मी अत्रंत आवडीने वाचत असतो. “जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांना शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन” रा उक्तीनुसारच आपले कार्र अखंंड चालू रहावे हीच अपेक्षा.
खडकलाट ता. चिकोडी, जि. बेळगाव श्री.अविनाश कुलकर्णी